पंचायत समिती, कुरखेडा संकेतस्थळ बाबत प्रस्तावना
पंचायत समिती कुरखेडा ची स्थापना दिनांक 01मे 1962 रोजी झालेली असुन तालुक्याचे भौगोलीक क्षेत्रु 14.35.97 चौ.की.मी असुन त्यात एकुण 128 गावांचा समावेश आहे सन 2011 च्या जनगणनेनुसार तालुक्याची लोकसंख्या 86073 आहे. त्यापैकी शहरी भागाची लोकसंख्या 7430 इतकी व ग्रामिण भागाची लोकसंख्या 78643 इतकी आहे तसेच अनु.जमातीची लोकसंख्या 41980 अनु.जाती ची लोकसंख्या 8446 व इतर 27513 इतकी आहे. पंचायत समिती, कुरखेडा अंतर्गत एकुण 45 ग्रामपंचायत असुन त्यापैकी 9 स्वतंत्र ग्रामपंचायती असुन 36 गट ग्रामपंचायत आहेत. लागवडी खालील क्षेत्र 1614 हेक्टर पैकी ओलीता खालील क्षेत्र 5766 हेक्टर असुन बीगर ओलीता खालील क्षेत्र 10380 हेक्टर आहे. त्यामध्ये मुख्य व्यवसाय शेती व मोलमजुरी असुन पेसा क्षेत्र असल्याने जंगलातील वनसंपत्तीवर अवलंबुन असतात प्रामुख्याने बांबुकटाई मोहफुल वेचने, मध गोळा करणे डिंक काढणे तसेच रानमेवा संकलित करुन त्याची विक्री करुन आपला उदरनिर्वाह करतात.तसेच सदर तालुक्यात मराठी गोंडी व छत्तीसगडी या भाषा बोलल्या जातात.