शिक्षण विभाग पंचायत समिती, कुरखेडा
विभाग प्रमुख
विभाग प्रमुखाचे नाव :- श्री. प्रविंद्र शिवणकर
पदनाम:- गटशिक्षणाधिकारी
दुरध्वनी क्रमांक:- 9403060402
इमेल:- beokurkheda@gmail.com
कक्ष प्रमुखाचे नाव:-श्री. अनिल मुलकलवार
पदनाम:- शिक्षण विस्तार अधिकारी तथा गटसमन्वयक
दुरध्वनी क्रमांक:- 8605329711
इमेल :- anilmulkalwar05@gmail.com
परिचय
पंचायत समिती कुरखेडा शिक्षण विभागांतर्गत इयत्ता १ ली ते 8 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते. तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकारी हे विभागप्रमुख असतात, बिट स्तरावर शिक्षण विस्तार अधिकारी हे बिट स्तरीय पर्यवेक्षिय अधिकारी असुन केंद्रस्तरावर केंद्रप्रमुख हे केंद्राचे पर्यवेक्षीय प्रमुख म्हणून कार्य करतात. केंद्र आणि राज्य शासन पुरस्कृत विविध योजना या विभागामार्फत राबविल्या जातात.
व्हिजन आणि मिशन
तालुक्यातील सर्व मुलांना गुणवत्तापूर्ण प्राथमिक शिक्षण प्रदान करून त्यांचा सर्वांगीण विकास साधणे ६ ते १४ वर्ष वयोगटातील सर्व मुलांना शाळेत दाखल करणे आणि त्यांची उपस्थिती सुनिश्चित करणे. शिक्षणाच्या गुणवत्तेत सुधारणा करून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास घडविणे. शाळांमध्ये मूलभूत सुविधा आणि अध्यापन साधनांची उपलब्धता सुनिश्चित करणे.




उदिष्ट्ये आणि कार्ये
प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण साध्य करणे. विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती वाढविणे आणि गळतीचे प्रमाण कमी करणे. शिक्षणाच्या गुणवत्तेत सातत्याने सुधारणा करणे. शिक्षण व्यवस्थापनात स्थानिक स्वराज्य संस्थांची सक्रिय सहभागिता सुनिश्चित करणे. शालेय पोषण आहार योजना राबविणे. शिष्यवृत्ती योजना अमलात आणणे. क्रीडा स्पर्धा आणि बाल आनंद मेळावे आयोजित करणे, मोफत गणवेश, मोफत पाठ्यपुस्तक व लेखन साहित्याचे वितरण करणे. शाळांची दुरुस्ती आणि नवीन इमारतींचे बांधकाम करण्यास जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव सादर करणे.
पुरस्कार आणि प्रशंसा
पंचायत समिती स्तरावर शिक्षण विभागामार्फत शिक्षक आणि शाळांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेण्यासाठी विविध पुरस्कार आणि सन्मान दिले जातात. हे पुरस्कार पीएम पोषण योजनेअंतर्गत उत्कृष्ठ परसबाग शाळांची स्पर्धा घेऊन तालुका स्तरावर पहिल्या तीन शाळांना प्रथम, व्दितीय व तृतीय पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो. त्याचप्रमाणे पीएम पोषण पाककृती स्पर्धेअंतर्गत स्वयंपाकी व मदतनीस यांच्या कृतीला व कलेचा सन्मान करण्यासाठी केंद्रातुन निवड करण्यात आलेल्या विजेत्यांसाठी तालुकास्तरावर स्पर्धा आयोजित करून प्रथम व्दितीय व तृतीय पुरस्कार देऊन उत्कृष्ठ कार्याबदल त्यांना प्रशस्तीपत्रक, बक्षीस देऊन सन्मान करण्यात येतो.
गुणवत्तापूर्ण शिक्षण, नावीन्यपूर्ण उपक्रम, आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या प्रयत्नांची प्रशंसा म्हणून प्रदान केले जातात. 1. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा पुरस्कारः शाळांच्या भौतिक आणि शैक्षणिक विकासात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शाळांना “मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” पुरस्कार दिला जातो. 2. क्रीडा स्पर्धा आणि बाल आनंद मेळावेः विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये क्रीडा स्पर्धा आणि बालआनंद मेळावे आयोजित केले जातात.
संघटनात्मक रचना
पंचायत समिती अंतर्गत तालुकास्तरावर प्राथमिक शिक्षण विभागाची संघटनात्मक रचना खालीलप्रमाणे आहे: तालुकास्तरः सर्व विभाग प्रमुख म्हुणन सवंर्ग विकास अधिकारी असुन त्याच्या अधिनस्त शिक्षण विभागात खालीलप्रमाणे संघटनात्मक संरचना आहे. तालुकास्तरः गटशिक्षणाधिकारीः तालुक्यातील प्राथमिक शिक्षणाच्या व्यवस्थापनासाठी जबाबदार अधिकारी बिट स्तर – बिट विस्तार अधिकारी केंद्रस्तरः केंद्रप्रमुखः काही शाळांच्या समुहाचे व्यवस्थापन करणारे अधिकारी. शाळास्तरः मुख्याध्यापकः शाळेच्या प्रशासकीय आणि शैक्षणिक कार्याचे प्रमुख, शिक्षकः विद्यार्थ्यांना अध्यापन करणारे कर्मचारी. प्रत्येक स्तरावरील अधिकारी आणि कर्मचारी आपापल्या कार्यक्षेत्रातील प्राथमिक शिक्षणाच्या व्यवस्थापन, गुणवत्ता सुधारणा, आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करतात.
त्याचप्रमाणे गटसाधन केंद्राअंतर्गत विविध विषयांचे विषय साधन व्यक्ती व दिव्यांग विभागातील विशेष तज्ञ व फिरते विषय शिक्षक गुणवत्ता विकासासाठी कार्यरत आहेत.
संलग्न कार्यालये
पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील प्राथमिक शिक्षण विभागाशी संलग्न विविध कार्यालये आणि विभाग कार्यरत आहेत, जे विभागाच्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी सहकार्य करतात. खालीलप्रमाणे काही प्रमुख संलग्न कार्यालये आणि त्यांची माहिती दिली आहे:
- गटशिक्षणाधिकारी कार्यालय: तालुक्यात गटशिक्षणाधिकारी कार्यालय कार्यरत आहेत. तालुक्यातील प्राथमिक शिक्षणाच्या व्यवस्थापन आणि देखरेखीची जबाबदारी सांभाळते.
- केंद्रस्तरीय कार्यालयेः समूह साधन केंद्र पातळीवर प्राथमिक शिक्षणाच्या योजनाची अंमलबजावणी आणि देखरेख करतात.
- इतर संबंधित शाळा प्राथमिक शिक्षण विभागाच्या कार्यात सहकार्य करतात तसेच इतर विभाग, जसे की बांधकाम विभाग (शाळांच्या इमारतींचे बांधकाम आणि देखभाल), आरोग्य विभाग (विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासण्या), आणि महिला व बालकल्याण विभाग (बालकल्याणाच्या योजना) हे देखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. वरील कार्यालये आणि विभाग प्राथमिक शिक्षणाच्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी एकत्रितपणे कार्य करतात.
जिल्हा परिषद शिक्षण विभाग (प्राथमिक)
गडचिरोली जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षणाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी ‘प्राथमिक शिक्षण विभाग गडचिरोली (Primary Education) कार्यरत आहे आणि माध्यमिक शिक्षण व्यवस्थापनाची जबाबदारी शिक्षण विभाग माध्यमिक हे गडचिरोली येथे स्थित असून, जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाच्या धोरणांची अंमलबजावणी, देखरेख, आणि नियमन करण्याची जबाबदारी पार पाडतात.
मुख्य कार्ये: जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षणाच्या धोरणांची अंमलबजावणी करणे. शिक्षकांच्या भरती, प्रशिक्षण, आणि सेवाशर्तीचे नियमन करणे, शाळांच्या मान्यता, अनुदान, आणि देखरेखीची जबाबदारी सांभाळणे, विद्यार्थ्यांच्या नावनोंदणी, उपस्थिती, आणि शैक्षणिक गुणवत्तेची देखरेख करणे. शालेय पायाभूत सुविधा आणि इतर आवश्यक संसाधनांची उपलब्धता सुनिश्चित करणे, सर्व शिक्षा अभियान आणि समग्र शिक्षा अभियान यांसारख्या केंद्र सरकारच्या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी, जिल्ह्यात जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, गडचिरोली व जिल्हा समग्र शिक्षा कार्यालय कार्यरत आहे. या कार्यालयांचे मुख्यालय गडचिरोली येथे आहे.
नांगरिकांचा कॉर्नर
सेवा :- शिक्षण विभाग नागरिकांना विविध सेवा प्रदान करतो, ज्यामुळे शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणाची सुविधा मिळते. प्राथमिक शिक्षण विभागाच्या प्रमुख सेवांमध्ये समाविष्ट आहेतः शाळांची स्थापना आणि व्यवस्थापनः नागरिकांना शाळा सुरू करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन आणि परवानगी करीता जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे शिफारस प्रदान करणे. प्रशिक्षणामध्ये शिक्षकांचे नियमित प्रशिक्षण सुनिश्चित करणे. प्रक्रियेचे आयोजन आणि त्यांचे नियमित प्रशिक्षण सुनिश्चित करणे. शाळा पायाभूत सुविधाः शाळांच्या इमारती, स्वच्छता, पाणीपुरवठा, आणि इतर आवश्यक सुविधांची व्यवस्था करणे, शाळा पोषण आहार योजनाः विद्यार्थ्यांना पोषणयुक्त आहार पुरवठा सुनिश्चित करणे. शाळा निरीक्षण आणि मूल्यांकनः शाळांच्या कार्यप्रदर्शनाचे नियमित निरीक्षण आणि मूल्यांकन करणे. फॉर्म: सर्व प्रकारच्या संबंधित माहिती तसेच योजनेअंतर्गत वेळोवेळी उपलब्ध करून देण्यात येणारे सर्व शासन निर्णय खालील वेबसाइट वर मिळेल. https://www.maharashtra.gov.in
योजना कार्यक्रम
जिल्हा परिषद :- गडचिरोली जिल्ह्यातील शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि शिक्षणाच्या गुणवत्तेत वाढ करण्यासाठी विविध योजना राबवल्या आहेत. काही महत्त्वपूर्ण योजनांची माहिती खालीलप्रमाणे आहेः 1. समग्र शिक्षा अभियान (Sarva Shiksha Abhiyan): ही योजना 6 ते 14 वयोगटातील सर्व मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण प्रदान करण्यासाठी राबविली जाते.
योजनेअंतर्गत, शाळांची पायाभूत सुविधा सुधारणा, शिक्षकांचे प्रशिक्षण, आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाची हमी दिली जाते. 2. कृतीयुक्त अध्ययन पद्धती कार्यक्रमः या योजनेचा उद्देश शाळेच्या कार्यक्षेत्रातील 100% मुलींना शाळेत दाखल करणे आणि त्यांची उपस्थिती 100% सुनिश्चित करणे आहे. या योजनेअंतर्गत, उत्कृष्ट पटनोंदणी करणाऱ्या शिक्षक आणि विस्तार अधिकाऱ्याऱ्यांना पारितोषिके आणि प्रशस्तिपत्रके देण्यात येतात.
काही महत्त्वपूर्ण योजनांची माहिती खालीलप्रमाणे आहे:
- समग्र शिक्षा अभियान (Samagra Shiksha Abhiyan): ही योजना प्री-स्कूल ते उच्च्च माध्यमिक स्तरापर्यंतच्या विद्यार्थ्यांना समाविष्ट करते. योजनेचा उद्देश सर्व मुलांना समावेशी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण प्रदान करणे आहे. यामध्ये सर्व शिक्षा अभियान (SSA), राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान (RMSA), आणि शिक्षक शिक्षण (TE) या तीन योजनांचा समावेश आहे. योजनेचा मुख्य भर शिक्षक आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षणाच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यावर आहे.
- पीएम-श्री योजना (PM-SHRI): प्रधानमंत्री स्कूल्स फॉर रायझिंग इंडिया (PM-SHRI) ही केंद्र पुरस्कृत योजना आहे, ज्या अंतर्गत सध्याच्या शाळांना सुदृढ करून अधिका-अधिक पीएम-श्री शाळा स्थापन करण्याची तरतूद आहे. या शाळा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अंमलबजावणीचे उदाहरण म्हणून उभ्या राहतील आणि इतर शाळांसाठी मार्गदर्शक ठरतील. या शाळामध्ये आधुनिक पायाभूत सुविधा, स्मार्ट क्लासरूम, संगणक लॅब, आणि इतर अत्याधुनिक सुविधा असतील वरील योजनांद्वारे, केंद्र सरकार प्राथमिक शिक्षणाच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील आहे.
धोरणे आणि मागदर्शक तत्वे
प्राथमिक शिक्षण विभागाने शिक्षणाच्या गुणवत्तेत सुधारणा, समावेशिता, आणि सर्वांगीण विकासासाठी विविध धोरणे आणि मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत. काही महत्त्वपूर्ण धोरणे आणि मार्गदर्शक तत्त्वे खालीलप्रमाणे आहेतः
- राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 (NEP 2020): राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत, प्राथमिक शिक्षणाच्या क्षेत्रात अनेक सुधारणा सुचविल्या आहेत, ज्यात मुलांच्या सर्वांगीण विकासावर भर, मुलांना आनंददायी शिक्षणाचे वातावरण, आणि शिक्षकांच्या गुणवत्तेत सुधारणा यांचा समावेश आहे.
- सातत्यपूर्ण आणि सर्वांगीण मूल्यमापन (CCE): शिक्षणाच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी, सातत्यपूर्ण आणि सर्वांगीण मूल्यमापन पद्धती लागू केल्या आहेत. या पद्धतीद्वारे, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसह त्यांच्या सामाजिक, भावनिक, आणि शारीरिक विकासावरही लक्ष दिले जाते.
- पूर्व-प्राथमिक शिक्षण धोरणः 0 ते 6 वर्षे वयोगटातील मुलांसाठी पूर्व-प्राथमिक शिक्षणाची दिशा निश्चित करणारे धोरण तयार केले गेले आहे. या धोरणानुसार, मुलांना खेळ, गाणी, गोष्टी, हस्तकला इत्यादींच्या माध्यमातून शिक्षण दिले जाते, ज्यामुळे त्यांचा सर्वांगीण विकास होतो.
- शालेय व्यवस्थापन आणि गुणवत्ता सुधारणाः शाळांच्या व्यवस्थापनात सुधारणा करण्यासाठी आणि गुणवत्तेत वाढ करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत. या तत्त्वांद्वारे, शाळांच्या पायाभूत सुविधांची उभारणी, शिक्षकांचे प्रशिक्षण, आणि विद्यार्थ्यांच्या सहभागावर भर दिला जातो.
आरटीआय संपर्क (पीआयओ/ एपीआयओ/एए)
श्री. नेताजी पुसाम, वरीष्ठ सहायक तथा जन माहीती अधिकारी, श्री. प्रविंद्र शिवणकर गटशिक्षणाधिकारी, तथा अपिलीय अधिकारी.
योजना कार्यक्रम
महाराष्ट्र राज्यातील प्राथमिक शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि शिक्षणाच्या गुणवत्तेत वाढ करण्यासाठी विविध योजना राबवल्या आहेत. काही महत्त्वपूर्ण योजनांची माहिती खालीलप्रमाणे आहे:
- समग्र शिक्षा अभियान (Sarva Shiksha Abhiyan): ही योजना 6 ते 14 वयोगटातील सर्व मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण प्रदान करण्यासाठी राबविली जाते. योजनेअंतर्गत, शाळांची पायाभूत सुविधा सुधारणा, शिक्षकांचे प्रशिक्षण, आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाची हमी दिली जाते.
- कृतीयुक्त अध्ययन पद्धती कार्यक्रमः या योजनेचा उद्देश शाळेच्या कार्यक्षेत्रातील 100% मुलींना शाळेत दाखल करणे आणि त्यांची उपस्थिती 100% सुनिश्चित करणे आहे, या योजनेअंतर्गत, उत्कृष्ट पटनोंदणी करणाऱ्या शिक्षक आणि विस्तार अधिकाऱ्यांना पारितोषिके आणि प्रशस्तिपत्रके देण्यात येतात.
- मानव विकास मिशन कार्यक्रम राबविणे
मानव विकास कार्यक्रमाअंतर्गत् इयत्ता 8 ते 12 मध्ये शिक्षण घेत असलेल्या व निवासस्थानापासून शाळेपर्यंत येजा करीत असलेल्या मुलींना मोफत बस प्रवास योजना, मोफत सायकल वाटप योजना इ. राबविल्या जातात.