ग्रामीण पाणीपुवठा उपविभाग, कुरखेडा जिल्हा परिषद गडचिरोली
विभाग प्रमुख
कार्यालय प्रमुखाचे नाव :- श्री. पृथ्वीराज पी. गेडाम
पदनाम:- उप-विभागीय अभियंता (ग्रा. पा. पु.)
दुरध्वनी क्रमांक:- 07139- 245132
इमेल:- rwssubdivision.kurkheda@gmail.com
परिचय :-
पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे तालुका स्तरावर ग्रामिण पाणी पुरवठा ०३ (गडचिरोली, कुरखेडा, अहेरी) उप-विभाग निर्माण करण्यास मान्यता प्रदान करण्यात आली होती. त्यानुसार ग्रामिण गावे/वाडया/वस्त्यांमध्ये ग्रामस्थांना मुलभुत सुविधा अंतर्गत शाश्वत पिण्याचे पाण्याची सोय करण्याचे दृष्टीने जिल्हा परिषद तालुका स्तरावर दिनांक ०५/०४/२०११ ला ग्रामिण पाणी पुरवठा उप-विभाग कुरखेडाची स्थापना करण्यात आली.
पदांचा तपशील :-
तांत्रिक शाखा-
उप-विभागीय अभियंता – 01
कनिष्ठ अभियंता – 06, भरलेली पदे – 04, रिक्त पदे – 02
अस्थापना शाखा-
वरिष्ठ सहाय्यक – 01
कनिष्ठ सहाय्यक – 01
व्हिजन आणि मिशन :-
ग्रामिण भागातील सर्व कुटुंबाना ” हर घर नल से जल ” ( FHTC- Functional Household Tap Connection ) प्रमाणे पाणी पुरवठा करण्यांस शासन कटीबद्ध आहे. राज्यातील ग्रामिण भागातील प्रत्येक घरात वैयक्तीक नळ जोडणीव्दारे दरडोई किमान 55 लिटर प्रती दिन गुणवत्तापुर्वक पाणी पुरवठा करणे हे जल जीवन मिशनचे प्रमुख उद्दीष्ट आहे. या अंतर्गत प्रत्येक ग्रामिण व्यक्तीस, पिण्यासाठी, स्वंयपाकासाठी आणि घरगुती वापरासाठी शुद्ध व पुरेसा आणि श्वाश्वत पाणी पुरवठा सर्वकाळ आणि सर्व परिस्थितीत सोयीच्या ठिकाणी उपलब्ध करुन देऊन कार्यक्षम पाणी पुरवठयाची एक श्वाश्वत सेवा उपलब्ध करणे हा त्यामधिल प्रमुख गाभा आहे.



उद्दिष्टे आणि कार्ये :-
- केंद्र शासन पुरस्कृत जल जीवन मिशन कार्यक्रमाअंतर्गत जिल्हयातील सर्व गावे/वाडया/वस्त्यांमध्ये पाणी पुरवठा योजना कार्यन्वीत करुन सर्व कुटुबांना नळ जोडणी (FHTC) देवून ५५ ली. प्रती माणसी प्रती दिवस शुद्ध व शाश्वत पाणी पुरवठा करणे.
- तालुक्यात एकुण ४४ PWS योजना आहेत. पाणी पुरवठा योजना कार्यन्वीत करुन एकुण २१,८३४ कुटूंबांना नळ जोडणी देण्याचे उद्दिष्ट होते.
- वरील प्रमाणे एकुण ५२ गावे हर घर जल घोषित करण्यात आले. असुन एकुण १९,५०८ कुटूंबांना नळ जोडणी (FHTC) देऊन पाणी पुरवठा करण्यात आलेला आहे.
- जल जीवन मिशन योजनेतील नळ जोडणीची तालुक्याची टक्केवारी 89.35% पुर्ण करण्यात आली आहे.
- नैसर्गिक आपत्ती पाणी टंचाई निवारणार्थ उपाययोजना विहीत कालावधीत पुर्ण करणे स्थानिक विकास कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे.
संलग्न कार्यालये :-
- राज्यस्तरीय : प्रधान सचिव, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग मंत्रालय मुंबई अभियान संचालक राज्य पाणी व स्वच्छता मिशन मुंबई आयुक्त भुजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा पुणे
- जिल्हास्तरीयः कार्यकारी अभियंता, ग्रामिण पाणी पुरवठा विभाग, गडचिरोली
नागरिकांचा कॉर्नर :-
सेवा :-
- जल जीवन मिशन कार्यक्रम (केंद्र सरकार योजना, भारत सरकार)
- जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत पाणी पुरवठा उपाययोजना
- जिल्हा वार्षिक आदिवासी उपाययोजना अंतर्गत पाणी पुरवठा उपाययोजना
- स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत पाणी पुरवठा उपाययोजना
- पाणी टंचाई कार्यक्रम अंतर्गत पाणी पुरवठा उपाययोजना
- जिल्हा खनिज विकास कार्यक्रम अंतर्गत पाणी पुरवठा उपाययोजना
फॉर्म :-
- सर्व प्रकारचे जिल्हयाशी संबधीत माहीती खालील वेबसाईट वर उपलब्ध आहे. https://www.ejalshakti.gov.in/
- सर्व प्रकारच्या योजना संबंधित माहिती तसेच योजनेअंतर्गत वेळोवेळी उपलब्ध करून देण्यात येणारे सर्व शासन निर्णय खालील वेबसाइट वर मिळेल. https://www.maharashtra.gov.in/
योजना/ कार्यक्रम-
राज्य सरकार :-
जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत पाणी
पुरवठा उपाययोजना :-
- जिल्हा वार्षिक आदिवासी उपाययोजना अंतर्गत पाणी पुरवठा उपाययोजना
- स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत पाणी पुरवठा उपाययोजना
- पाणी टंचाई कार्यक्रम अंतर्गत पाणी पुरवठा उपाययोजना
- जिल्हा खनिज विकास कार्यक्रम अंतर्गत पाणी पुरवठा उपाययोजना केंद्र सरकार :- जल जीवन मिशन कार्यक्रम संयुक्त उपक्रम केंद्र आणि राज्य : जल जीवन मिशन कार्यक्रमाअंतर्गत (50% केंद्र सरकार + 50% राज्यसरकार सहभाग)
कागदपत्रे :-
धोरणे आणि मार्गदर्शक तत्त्वे सर्व प्रकारचे जिल्हयाशी संबधीत माहीती खालील वेबसाईट वर उपलब्ध आहे. https://www.ejalshakti.gov.in/
योजना कागदपत्रे :-
सर्व प्रकारचे जिल्हयाशी संबधीत माहीती खालील वेबसाईट वर उपलब्ध आहे. https://www.ejalshakti.gov.in/
सर्व प्रकारच्या योजना संबंधित माहिती तसेच योजनेअंतर्गत वेळोवेळी उपलब्ध करून देण्यात येणारे सर्व शासन निर्णय खालील वेबसाइट वर मिळेल.https://www.maharashtra.gov.in/