1
कार्यकाल :-
पंचायत समितीच्या कार्यकाल ‘पाच’ वर्षांचा आहे व ती बरखास्त करण्याचा अधिकार ‘राज्यशासनास’ आहे. त्या नंतर ‘सहा’ महिन्यांच्या आत निवडणूक घ्यावी लागते.
2
सरपंच समिती :-
पंचायत समिती गटामधील एकूण सरपंचांच्या १/५ किंवा १५ सरपंच पैकी जी संख्या अधिक असेल तिची सरपंच समिती बनते. पंचायत समितीचा उपसभापती हा अध्यक्ष असतो आणि समितीचा पदसिद्ध सचिव म्हणून विस्तार अधिकारी काम पाहतो .
3
पंचायत समित्यांची रचना :-
प्रत्येक पंचायत समितीमध्ये कलम ५८ आणि त्या बाबतचे नियम यांत अंतर्भूत असलेल्या तरतूदींनुसार प्रत्येक निर्वाचक गुणामधून प्रत्येक एक याप्रमाणे प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे निवडलेल्या सदस्यांचा समावेश असेल परंतु पंचायत समीतीच्या प्रादेशिक क्षेत्राची लोकसंख्या आणि अशा पंचायत समितीमधील निवडणुकीद्वारे भरावयाच्या जागांची संख्या यामधील गुणोत्तर व्यवहार्य असेल तेथवर सम्पुर्ण राज्यामध्ये सारखेच असेल.






महाराष्ट्र राज्य मंत्री महोदय आणि पंचायत समिती कुरखेडा अधिकारी.





